संपादक-२०२० - लेख सूची

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या माध्यमातून वेगवेगेळे सामाजिक विषय आपण हाताळत असतो. ह्या सर्वांच्या मुळाशी तर्क आणि विवेकवाद असावा अशी ‘सुधारक’ची आग्रही मागणी असते. एप्रिल २०१० मध्ये ‘आजचा सुधारक’चा ‘अंधश्रद्धा विशेषांक’ प्रकाशित झाला होता. आज तब्बल १० वर्षांनी साधारण त्याच अंगाने जाणारा विषय आपण घेतो आहोत, हे खरेतर मरगळलेल्या समाजाचे लक्षण आहे. तरी असे विषय घेतल्यानेच वाद-संवाद घडतात, …

मनोगत

आजचे वर्तमान उद्याचा इतिहास असतो असे जेव्हा जेव्हा म्हटले जाते तेव्हा इतिहासाचे सामान्यीकरण होते असे नाही. तसेही इतिहास हा कधीच खूप भव्य-दिव्य किंवा काळवंडलेला नसतो. तथ्यांचे तपशील, (मग ती तथ्ये कधी उजळवून टाकणारी, आशादायी किंवा कधी उदासीन करणारी, हिंसक अशी असू शकतात) त्यांचे दस्तावेजीकरण हे इतिहासाचे महत्त्वाचे अंग आहे. कोरोनाची नोंद उद्याच्या इतिहासात होईल. आजवर …

पत्रोत्तरे

‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकातील लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांवर मूळ लेखकांनी पाठवलेली पत्रोत्तरे तसेच इतरांचे अभिप्राय प्रकाशित करीत आहोत. सकारात्मक बदल घडवून आणण्यात वैचारिक द्वंद्वांची महत्त्वाची भूमिका असते. आपले विचार परत परत तपासून घेऊन त्यास अधिक धारदार करणे वा विरूद्ध विचार पटल्यास त्यांना आत्मसात करणे असे सतत होत राहिले पाहिजे. सुधारकच्या माध्यमातून असे होत असलेले बघून आनंद वाटतो. …

मनोगत

‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकातील लेखांवर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यांपैकी काही नवे मुद्दे, प्रश्न व विचार व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया संबंधित लेखांच्या खाली प्रकाशित केल्या आहेतच. ह्या विशेषांकात इतर लेखांव्यतिरिक्त ‘सुधारक’च्या ऑक्टोबर २०१९ च्या अंकात प्रकाशित झालेल्या डॉ. सुभाष आठले ह्यांच्या ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या  लेखावरील प्राची माहूरकर ह्यांची प्रतिक्रिया प्रकाशित केली. त्यावरही …

मनोगत

जगातील आजची परिस्थिती अभूतपूर्व म्हणावी लागेल. ह्याचा अर्थ असा नव्हे की आजवर साथीचे रोग आलेच नाहीत. आले, परंतु त्यावरील उपाय म्हणून जागतिक संचारबंदी लादावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. अश्या संचारबंदीचे परिणाम काय होत आहेत आणि काय होणार आहेत, ह्यांचा विचार सर्वप्रथम करणे क्रमप्राप्त आहे. अगदी अलीकडेपर्यंत सुरू असलेले जातीय, धार्मिक, राजकीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न ह्या …

आवाहन

स्नेह. १ एप्रिलला ‘सुधारक’चा पुढील अंक प्रकाशित होत आहे. ह्या अंकासाठी विषयाचे बंधन नसून आपल्याला जवळचा वाटणारा कोणताही संवेदनशील विषय आपण घेऊ शकता. ‘सुधारक’ कथा, कविता, ललित, विनोदी, विडंबनात्मक, निबंधात्मक, परीक्षणात्मक अशा कुठल्याही स्वरुपातील लिखाणाचे स्वागत करते. – सद्यःस्थितीचा आढावा घ्यायचा झाल्यास नागरिकत्व संशोधन कायद्याविषयीच्या समज-गैरसमजांवर तथ्यात्मक, विश्लेषणात्मक असे काही आपण घेऊ शकतो.– करोनाच्या विषाणूमुळे जगभरात निर्माण …